शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील रस्त्यांच्या स्थितीचा यावेळी पाटील यांनी आढावा घेऊन दर्जेदार कामाचेही अधिकाºयांना आवाहन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. एम. पिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव आर. डी. जोशी, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झाले नाहीत. शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यांत ४० हजार किलोमीटरचे रस्ते होतील. २२ हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील १० हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि ‘भारतमाला’मधून ६ हजार ५०० किलोमीटरचे सहा पदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने २ हजार जणांना पदोन्नती दिली आहे. आणखी १०० जणांना देण्यात येणार आहे; पण २०० जणांना निलंबितही करण्यात आले आहे.‘दादां’चा वडीलकीचा सल्लादिवसातील अर्धा तास तरी स्वत:साठी जगा. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आपआपल्या जीवनसाथीचे म्हणणे नीट समजून घ्या, ऐकून घ्या. सामाजिक उत्तरदायित्व जाणीवपूर्वक जोपासा. संयमाने ऐकण्याची स्वत:ला सवय लावा, समोरच्याचे व्यवस्थित ऐकून घेतल्याने ९० टक्के प्रश्न सुटतात. यातून कार्यालयीन संस्कृतीत विश्वास, जिव्हाळा, एकोपा वाढतो. अशा चांगल्या कार्यसंस्कृतीची आज देशाला गरज आहे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.